Ad will apear here
Next
लहान मुली देणार वाहतुकीच्या नियमांचे धडे
‘लायन्स क्लब्स इंटरनॅशनल’तर्फे आगळावेगळा उपक्रम
पुणे : अलीकडील काळात वाहनांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढल्याने अनेकदा वाहतूक ठप्प होते. मोठ्या शहरांत तर या समस्येला नेहमीच सामोरे जावे लागते. ही बाब हेरून पुण्यातील विविध शाळांमधील २०० लहान मुली एकत्र येऊन वाहनधारकांमध्ये वाहतुकीचे नियम पालन व शिस्त याबाबत जागृती करणार असून, वाहतूक शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

‘लायन्स क्लब्स इंटरनॅशनल ३२३४ डी२’ या प्रांतातर्फे चार ऑक्टोबर २०१८ सकाळी ८.३० वाजता अलका टॉकीज चौकाजवळ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त के. वेंकटेशम, महापौर मुक्ता टिळक, लायन्स क्लबचे प्रांताधिकारी लायन रमेश शहा, लायन्स प्रांतीय अध्यक्ष तथा ट्रॅफिक अवरेनेस लायन नंदा पंडित, रिजन चेअरमन लायन बिपिन पाटोळे, झोन चेअरमन लायन संतोष पंडित, हेल्प रायडर्सचे संस्थापक प्रशांत कनोजिया व सहकारी यांसह पुण्यातील बहुतांशी लायन्स क्लबचे अधिकारी, राजकीय व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

उपक्रमाविषयी :
दिवस :
गुरुवार, चार ऑक्टोबर २०१८  
वेळ : सकाळी ८.३० वाजता
पत्ता : अलका टॉकीज चौक, पुणे.
अधिक माहितीसाठी संपर्क : कांचन बडवणे- ८४४६३ ९७०४४, दीपक आवळे- ९३७३६ ४५३९८
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZXSBT
Similar Posts
‘पोलिसांना ऊर्जा देणारा ‘लायन्स’चा उपक्रम’ पुणे : ‘गणेश विसर्जन मिरवणूक निर्विघ्न पार पाडण्यासाठी पोलीस अहोरात्र बंदोबस्तात असतात. जवळपास ३० तास ड्युटी करणाऱ्या पोलिसांना सकस आहार मिळावा, यासाठी लायन्स क्लब ऑफ पूना सारसबाग आणि लायन्स क्लब पूना सारसबाग चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने उभारलेले श्रमपरिहार केंद्र पोलिसांसाठी ऊर्जा देणारा उपक्रम आहे
मंजूषा मुळीक बनल्या ‘मिसेस महाराष्ट्र २०१७’ पुणे : ‘मिसेस महाराष्ट्र २०१७’ या सौंदर्य स्पर्धेचा दुसरा सिजन नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. उंची, व्यक्तिमत्त्व, आत्मविश्वास, रॅम्पवॉक, इच्छाशक्ती, संवाद कौशल्य व परीक्षकांनी दिलेले गुण या निकषांवर मंजूषा मुळीक यांनी ‘मिसेस महाराष्ट्र २०१७’ चा किताब पटकावला.
‘शोध मराठी मनाचा’ संमेलन पुण्यात पुणे : जागतिक मराठी अकादमीतर्फे आयोजित करण्यात येणारे ‘शोध मराठी मनाचा’ हे पंधरावे जागतिक संमेलन एक ते तीन जानेवारी २०१८ या कालावधीत पुणे येथे होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्षपद ऑस्ट्रेलिया येथील अभियंते आणि ऑस्ट्रेलियन सरकारने ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवलेले डॉ. विजय जोशी भूषवणार आहेत
‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यात हजार नवीन बसेस पुणे : ‘पीएमपीएमएल’च्या संचालक मंडळाच्या १७ नोव्हेंबरला झालेल्या बैठकीत सार्वजनिक वाहतुकीसाठी नवीन बस घेण्याबरोबरच प्रवासीभाडे वाढीच्या प्रस्तावावरही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यानुसार ऑगस्ट २०१९पर्यंत ‘पीएमपीएमएल’च्या ताफ्यात एक हजार नवीन बसेस समाविष्ट होणार असून, प्रत्येक बस थांब्यावर नागरिकांना दर पाच मिनिटांनी बस उपलब्ध होणार आहेत

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language